कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणी नंतर विजयी उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नव्हती. तरीही जिल्ह्यातील जयसिंगपूर, वडगाव आणि शाहूवाडी या ठिकाणी विजयी मिरवणूक काढल्याबद्दल गुन्हे दाखल केलेले आहेत.

जयसिंगपूर येथील क्रांती चौकामध्ये जेसीबीने गुलालाची उधळण करून कोविडच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे. याचप्रमाणे वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आलेल्या बेकायदेशीर मिरवणुकीवरही गुन्हा नोंद झाला आहे. तसेच शाहूवाडी पोलीस ठाणे येथे विजयी उमेदवार, त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.