हातकणंगले येथे आ. नाना पटोले यांचा भाजपाच्या वतीने निषेध…

टोप (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करत भाजपाच्या वतीने हातकणंगले इथे आज (मंगळवार) करण्यात आली. तसेच आ. पटोले यांच्या पोस्टराला जोडे मारत तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आ. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनुद्गार काढले होते. मी त्यांना मारु शकतो अस वक्तव्यही केले होते.… Continue reading हातकणंगले येथे आ. नाना पटोले यांचा भाजपाच्या वतीने निषेध…

जिल्ह्यात चोवीस तासात ३८७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३८७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – २२९, आजरा – ६, भुदरगड – ४, चंदगड – ७, गडहिंग्लज – २, गगनबावडा – १, हातकणंगले – १४, कागल – ६,  करवीर… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात ३८७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

शिवाज्ञा गडसंवर्धनच्या सदस्यांची कौतुकास्पद कामगिरी…

कडगाव (प्रतिनिधी) : गडसंवर्धनाचे ध्यास घेतलेल्या शिवाज्ञा परिवारातील तरुणांनी गेली कित्येक वर्षे सोनगड-किल्ल्याच्या खोल दरीतील अडकून पडलेल्या तोफा स्वराज्याभिषेक दिनी पुन्हा गडावर विराजमान करून कौतुकास्पद काम केले आहे.सोनगडावरील तोफा तब्बल १७५ वर्षे या दरीत पडून होत्या. याचा शोध शिवाज्ञा गडसंवर्धनच्या सदस्यांनी दरीखोर्‍यातून घेत त्या पुन्हा गडावर आणण्यासाठी मेहनत घेतली. यावेळी शिवाज्ञाच्या सर्व सदस्यांनी सुमारे दोन… Continue reading शिवाज्ञा गडसंवर्धनच्या सदस्यांची कौतुकास्पद कामगिरी…

एन. डी. पाटील यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी : धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळं एक लढावू आणि अभ्यासपूर्ण नेतृत्व आपण गमावले आहे. एन.डी.पाटील यांनी कष्टकरी आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी आपले आयुष्य वेचले. अंधश्रध्दा निर्मुलन असो किंवा परिवर्तनाची चळवळ असो, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आघाडीवर असायचे. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाल्याचे माजी खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.… Continue reading एन. डी. पाटील यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी : धनंजय महाडिक

गारगोटीमध्ये खुद्द न्यायाधीशांनीच केला चोरटा जेरबंद…

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटीत गेल्या दिडदोन वर्षांपासून दारात वाळत टाकलेली कपडे आणि इतर साहित्य चोरीला जात होते. मध्यरात्रीच्यावेळी हा विकृत मनोवृत्तीचा चोरटा अनेकांच्या घरातील कपडे चोरत होता. न्यायालय परिसरात आज (सोमवार) पहाटे चोरी करत असताना खुद्द न्यायाधीशांनीच पाळत ठेऊन त्याला रंगेहाथ पकडले. सुशांत सदाशिव चव्हाण (वय ३५, रा. सोळांकूर, ता. राधानगरी, सध्या रा. सोनाळी-गारगोटी) असे… Continue reading गारगोटीमध्ये खुद्द न्यायाधीशांनीच केला चोरटा जेरबंद…

प्रसिद्ध कथ्थक नर्तक, पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. काल (रविवार) मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बिरजू महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते.… Continue reading प्रसिद्ध कथ्थक नर्तक, पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन…

डॉ. एन. डी. पाटील यांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते, सामाजिक चळवळीतील अग्रणी डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्या  प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले आहे. मागील… Continue reading डॉ. एन. डी. पाटील यांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी दोन कोटींचा मंजूर : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर संवर्धन कामांना आता प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. या कामासाठी २०२१-२०२२ च्या दुसऱ्या टप्प्यात एक कोटी रुपये मंजूर झाले असून तर जिल्हयात पर्यटन विकासासाठी एकूण २ कोटी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. राज्य सरकारने रंकाळा तलावाचे जतन व संवर्धन… Continue reading कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी दोन कोटींचा मंजूर : पालकमंत्री

गुजरीतून कारागिर, मुर्तीकार गायब : सराफांची मात्र आळमिळी गुपचिळी

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : सर्वांनाच परिचित असलेल्या सराफ बाजारातून म्हणजेच आपल्या गुजरीतून एक बंगाली कारागीर आणि एक चांदी मूर्तिकार असे दोघे जण गेल्या काही दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे गुजरीतील सराफ व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. खळबळ उडाली असली तरी याप्रकरणाबद्दल अडचणीत आलेल्या सराफांनी आळी मिळी, गुपचिळीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांपर्यंत हे प्रकरण अद्यापपर्यंत पोहचलेच… Continue reading गुजरीतून कारागिर, मुर्तीकार गायब : सराफांची मात्र आळमिळी गुपचिळी

मुरगुड विद्यालयाचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले…

मुरगुड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडमधील पाचवीचे तीन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत यश संपादन केले आहे. तसेच जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवीचे आठ तर आठवीचे सहा विद्यार्थी आले आहेत. कागल तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत आठवीत प्रथम तर पाचवीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक… Continue reading मुरगुड विद्यालयाचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले…

error: Content is protected !!