कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर ? ; उदय सामंतांची सावध प्रतिक्रिया…

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. रत्नागिरीतील सामंत बंधूंमधील वाद सर्वांसमोर आला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत. तसेच कार्यालयावरील नाव बदलत उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लावणार असल्याची भूमिका किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी… Continue reading कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर ? ; उदय सामंतांची सावध प्रतिक्रिया…

अनंत गीतेंनी आयुष्यभर धर्माच्या नावाखाली निवडणूक लढली : सुनील तटकरेंची टीका

रायगड : या देशाच्या संसदेची निवडणूक देशाच्या अस्मितेची आणि देशाचे भवितव्य घडवणारी आहे. त्यामुळे ७ मे रोजी होणार्‍या निवडणूकीत घड्याळ चिन्हावर बटन दाबत १८ व्या लोकसभेत आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी तळा येथील महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत केले. बुधवारी रात्री… Continue reading अनंत गीतेंनी आयुष्यभर धर्माच्या नावाखाली निवडणूक लढली : सुनील तटकरेंची टीका

विशाल पाटील भाजपची ‘बी’ टीम ; एक टक्काही तोटा होणार नाही : चंद्रहार पाटील

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यत आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी लढत होत आहे. विशाल पाटील हे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तरीही त्यांनी पक्षादेश न मानता बंडखोरी करत सांगली लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. यावर… Continue reading विशाल पाटील भाजपची ‘बी’ टीम ; एक टक्काही तोटा होणार नाही : चंद्रहार पाटील

पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का..? चित्रा वाघ यांचा ‘कुणाला’ सवाल..?

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांविरोधात तोफ डागत आहेत. एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रात पुढील तीन टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचार सभाचा धूमधडाका सुरू आहे. अशातच आता नेत्यांची ही लढाई जाहिरीवरून सुरु झाले आहे. ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला… Continue reading पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का..? चित्रा वाघ यांचा ‘कुणाला’ सवाल..?

पंतप्रधानांनी ‘हा’ जावईशोध कुठून लावला? ; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

कोल्हापूर : देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. प्रत्येक टप्प्यात मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेताना दिसत आहेत. यावेळी प्रचार सभेत बोलताना त्यांच्याकडून वारंवार एकच आरोप होताना दिसत आहे. तो म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 5 वर्षांत 5 पंतप्रधान आणणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी… Continue reading पंतप्रधानांनी ‘हा’ जावईशोध कुठून लावला? ; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

…तर संभाजीराजेंची माफी मागतो ; आम्ही शेण खाल्लं असेल, आता तुम्ही का खाताय ? : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. तर उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्हीकडून जंगी सभा घेतल्या जात आहेत. महायुतीने संजय मंडलिक यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी 27 एप्रिलला जंगी सभा घेतली होती. तर महाविकास आघाडीने काल बुधवारी (1… Continue reading …तर संभाजीराजेंची माफी मागतो ; आम्ही शेण खाल्लं असेल, आता तुम्ही का खाताय ? : उद्धव ठाकरे

शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत – नारायण राणे

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण जोरदार सुरु आहे. जसजसं उन्हाचा पारा वाढत चाललाय, तसतसं राजकीय तापमान देखील तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे . विरोधी पक्ष नेते एकमेकांवर तोफ डागत आहेत. एकमेंकाविरोधात वार करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधला आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत – नारायण राणे

शाहू महाराजांच्या आडून तयार होत असलेल्या नव्या महाराजाला थांबवा – पी.जी. शिंदे

पी.जी. शिंदे यांचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र वेतवडे, (प्रतिनिधी ) ; कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीला एक वेगळी धार चढत आहे. या निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या आडून एक नवा महाराज तयार होत आहे त्याला थांबवा, अशी टीका भाजपचे नेते पी. जी. शिंदे यांनी केली. हा कुटील महाराज तालुक्याला लाचारी करायला लावणारा, कुटुंबांना वेठीस धरणारा,… Continue reading शाहू महाराजांच्या आडून तयार होत असलेल्या नव्या महाराजाला थांबवा – पी.जी. शिंदे

अनंत गीते हिरवा साप, म्हणून… ; सुनील तटकरेंची टीका

पाली : आज व्हॉटसअपच्या माध्यमातून समाजासमाजामध्ये अंतर निर्माण करत जे सामंजस्य राखण्याचे आम्ही सर्व मंडळींनी प्रयत्न केले त्याला जाणीवपूर्वक नख लावण्याचे पाप इंडीया आघाडीच्या आणि अनंत गीते यांच्या माध्यमातून या मतदारसंघात केले जातेय यापासून सर्वांनी सावध रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी पाली येथील सभेत केले.… Continue reading अनंत गीते हिरवा साप, म्हणून… ; सुनील तटकरेंची टीका

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबईच्या विश्वस्तांची गोकुळला भेट

कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) : श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष, माहिमचे आमदार सदानंद सरवणकर व ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) मुख्य प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे बुधवार दि.०१/०५/२०२४ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली असता त्यांचा सत्कार गोकुळ परिवाराच्यावतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती… Continue reading सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबईच्या विश्वस्तांची गोकुळला भेट

error: Content is protected !!