मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांविरोधात तोफ डागत आहेत. एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रात पुढील तीन टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचार सभाचा धूमधडाका सुरू आहे. अशातच आता नेत्यांची ही लढाई जाहिरीवरून सुरु झाले आहे. ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. एका जाहिरातीवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल केला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

काय म्हणाल्या चित्रा वाघ..?

या पत्रकार परिषेदत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना चांगलंच सुनावलं आहे . चित्रा वाघ यांनी म्हटले की, शिवसेना उबाठा गटाने महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो. अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली असा सवाल त्यांनी केला.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की ,, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट कसली संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे? असे बाप जाहिरातीमध्ये वापरून ठाकरे गट बाप असल्याचं महाराष्ट्राला दाखवणार आहे का? आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी आग्रह धरला होता. आता, त्यांना पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल करत एक पॉर्न स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये झळकतो. ठाकरे गटाला जाहिरातीसाठी दुसरा कलाकार मिळाला नाही का? जाहिरात तयार करणारी कंपनी आणि ठाकरे यांचा काही संबंध आहे का? त्याबद्दल आम्हाला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे. उद्धव ठाकरे यांनी याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला दिलं पाहिजे, याचा तपास व्हायला पाहिजे असेही चित्रा वाघ यांनी म्हटल्या. आता यावर ठाकरे गट काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे