मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण जोरदार सुरु आहे. जसजसं उन्हाचा पारा वाढत चाललाय, तसतसं राजकीय तापमान देखील तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे . विरोधी पक्ष नेते एकमेकांवर तोफ डागत आहेत. एकमेंकाविरोधात वार करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधला आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच पुण्यात सभा झाली होती. या सभेत त्यांनी शरद पवार भटकती आत्मा असल्याची टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला होता. मी स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्याचे दुखणे मांडण्यासाठी अस्वस्थ आहे, असा हल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला होता. आता यावर नारायण राणे यांनी पवारांवर निशाणा चढवत शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाही असे म्हणाले आहेत.

काय म्हणाले नारायण राणे

सिंधुदुर्गमध्ये बोलताना नारायण राणे यांनी म्हटले की, शरद पवार हे एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते. ते अस्वस्थ कधीच नसतात. ते बिनधास्त असतात. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. बारा वर्ष केंद्रीय मंत्री राहिले. संरक्षण मंत्री दोन वर्षे राहिले. त्यानंतरही काहीच करु शकले नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक पद भोगली तरी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. आता अस्वस्थपणा का जाणवतो, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
आता यावर शरद पवार नारायण राणे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

काय म्हणाले होते शरद पवार..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती अस्वस्थ आत्मा म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता पंतप्रधान यांच्या टीकेवर शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिला आहे ते म्हणाले, होय माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खर आहे पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी राहील तर शेतकऱ्यांचे दुखणे बघून अस्वस्थ आहे. तुमच्या राजवटीत आदेशात महागाई वाढले आहेत लोकांना संसार करणे कठीण झाले आहे त्यासाठी मी एकदा नाही तर 100 वेळा अस्वस्थ होईल त्यात गैर काय आहे अशा शब्दात पवार यांनी मोदींना सुनावला आहे