‘आयफोन’ची बारावी सिरीज आज होणार लाँच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्टफोन क्षेत्रातली दिग्गज कंपनी अॅपल आज iPhone १२ सिरीज लाँच करण्याची  शक्यता आहे. कंपनी या सिरीजमध्ये एकाचवेळी चार फोन बाजारात आणणार आहे. हा एक ऑनलाईन इव्हेंट असणार असून याची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता होणार आहे. हा इव्हेंट अॅपलची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. एका रिपोर्टनुसार कंपनी चार… Continue reading ‘आयफोन’ची बारावी सिरीज आज होणार लाँच

कोरोनाबाबत दिलासादायक बातमी..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात मागील काही महिन्यांपासून दररोज लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासांतील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची नीचांकी नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली असली, तरी प्रत्यक्षात ६२ लाख २७ हजार… Continue reading कोरोनाबाबत दिलासादायक बातमी..!

‘दलबदलू’ अभिनेत्रीचा काँग्रेसला रामराम ! 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या ‘दलबदलू’ प्रतिमेसाठी विख्यात, मात्र तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली अभिनेत्री खुशबू सुंदर हिने काँग्रेसला रामराम करीत हाती ‘कमळ’ घेतले आहे. आज (सोमवार) त्यांनी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. खुशबू या हिशेबी राजकारणासाठी पटाईत आहेत. त्यांनी… Continue reading ‘दलबदलू’ अभिनेत्रीचा काँग्रेसला रामराम ! 

पुलवामामधील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर भागात सुरु असणाऱ्या दहशतवादी हालचाली काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आज (सोमवारी) काही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ११० बटालियनवर बेछूट गोळीबार केला. जम्मू काश्मीर पोलिसांच्या साथीने ही जवानांची तुकडी पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कंदीझल पूलापाशी रोड ओपनिंग ड्युटीसाठी तैनात होती. माहितीनुसार दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात २ जवान शहीद झाले आहेत.… Continue reading पुलवामामधील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

जुलै २०२१ पर्यंत कोरोना लस देण्यात येईल : केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर प्रतिबंधात्मक लस निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जुलै २०२१ पर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोना प्रतिबंध लस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. कोरोनावरील लस निर्मितीसाठी विविध कंपन्या प्रयत्न करीत आहेत. काही कंपन्यांची लस दुसऱ्या, तिसऱ्या टप्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री हर्षवर्धन… Continue reading जुलै २०२१ पर्यंत कोरोना लस देण्यात येईल : केंद्रीय आरोग्य मंत्री

तर बलात्कार होणार नाहीत : सुरेंद्र सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण तापलेले असताना भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुलींना चांगले संस्कार द्या, म्हणजे बलात्कार होणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. परिणामी त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,  मी आमदारासह एक शिक्षकही आहे. बलात्काराच्या घटना… Continue reading तर बलात्कार होणार नाहीत : सुरेंद्र सिंह

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…

कोल्हापूर (सुजाता पोवार) : संपूर्ण मानवजात जिच्यावर अवलंबून आहे, तीच ‘स्त्री’ आजही असुरक्षितच आहे. आपण तंत्रज्ञानात, वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षणात दिवसेंदिवस प्रगती करत आहोत. पण एक माणूस म्हणून आपण खरंच प्रगत आहोत का..? रोज सकाळच्या चहासोबत आपण स्त्रियांवरील अत्याचाराच्या,बलात्काराच्या घटना ऐकतोय, पाहतोय, वाचतोय आणि, ‘काय व्हायचं या देशाचं..?’, असं म्हणून एक निश्वास सोडतोय. इथंच एक नागरिक… Continue reading स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…

केंद्राच्या नव्या नियमांमुळे सभासदांच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता : अनिल नागराळे (व्हिडिओ)

केंद्र शासनाने सहकारी बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात केलेल्या बदलांमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांवर काय परिणाम होणार या विषयी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकरी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी मत व्यक्त केले.  

‘या’ अॅपवर मिळणार घरबसल्या कोरोना रुग्णांची माहिती…  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या दृष्टीने आता गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अ‍ॅड करीत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे. या फिचरला कोव्हिड लेअर असे नाव देण्यात आले आहे.… Continue reading ‘या’ अॅपवर मिळणार घरबसल्या कोरोना रुग्णांची माहिती…  

भारत बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने २५ तारखेच्या पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील असून राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे. मोदी सरकारने राज्यसभेत ३ शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली आहे. या विधेयकाचे तीव्र… Continue reading भारत बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे : राजू शेट्टी

error: Content is protected !!