नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण तापलेले असताना भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुलींना चांगले संस्कार द्या, म्हणजे बलात्कार होणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. परिणामी त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,  मी आमदारासह एक शिक्षकही आहे. बलात्काराच्या घटना संस्कारामुळे थांबू शकतील. प्रत्येक आई, वडिलांनी आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्यावे. बलात्काराच्या घटना सरकार किंवा तलवारीमुळे थांबणार नाहीत. असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.