धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनाचे चांगले नियोजन केले आहे. चौदाव्या वित्त आयोगातून त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला आहे. आठवडा बाजारात निर्माण होणारा कचरा यातून घेऊन जावून विल्हेवाट लावली जात आहे.

सामाजिक आणि वैयक्तिक कार्यक्रमासाठी पाण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तीन हजार दोनशे लिटरची टाकी खरेदी केली आहे. त्याचे पुजन आज सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सरपंच अशोक सुतार म्हणाले, धामोड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जाधववाडी, कुरणेवाडी, लाडवाडी, तुळशी धरण वसाहत तसेच आसपासच्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची टाकी अल्पशा भाडेतत्त्वावर उपलब्ध होईल.
याप्रसंगी उपसरपंच प्रशांत पोतदार, ग्रामविकास अधिकारी एल. एस. इंगळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.