प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) राज्यात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने सुरु आहेत. दरम्यान बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमात एकाच मंचावर होते. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित बारामतीकरांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे भाषणासाठी उभे राहील्यानंतर ( प्रेक्षक वर्गाने ) त्यांच्यासाठी वाजवलेल्या टाळ्या अन् शिट्यांची दिलेली साथ आता चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन झालं. यावेळी प्रेक्षक शांतपणे कार्यक्रम पहात, ऐकत होतं. मात्र शरद पवार जसे बोलण्यासाठी उभे राहीले यावेळी प्रेक्षकांचा जल्लोष सुरु झाला. हा जल्लोष आता राजकीय वर्तूळाचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान कथित चर्चेप्रमाणे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले वडील शरद पवारांना हात देत काही पाऊल चालत त्यांना चालण्यासाठी आधार दिला. अन् प्रेक्षकांच्या शिट्या अन् टाळ्या जोराने सुरु झाल्या. आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चेहऱ्यावरील भावच बदलले असल्याची चर्चा ही सुरु आहे. त्यामुळे ह्या टाळ्या अन् शिट्या लोकसभा विधानसभेसाठीच होत्या का ? हे आताच समजणे कठीण आहे.