कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा येथे पंचगंगा नदीतून एका तरूणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज (शनिवार) पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी शोधमोहीम राबवली. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.
शिंगणापूर बंधाऱ्यावरून दुचाकीस्वार नदीत पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पहाटे ३.११ वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. त्यानंतर सुनील कांबळे, कृष्णा सोरटे, दीपक पाटील, शुभांगी घराले यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबविली.