कोल्हापूर (प्रतिनिधी) ;  कोरोनाचा प्रार्दुभावामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस यांच्यावर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) युवासेनेच्या वतीने कोल्हापूरचे संपर्क मंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेसना पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने केले होते.

या कार्यक्रमासाठी युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई, संपर्क प्रमुख अरुणदुधवडकर तसेच कोर कमिटी सदस्य पवन जाधव, विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवाने, युवासेना शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव,वैभव जाधव, स्मिता सावंत, शेखर बारटक्के, मंगेश चितारे आदी उपस्थित होते.