देवगड (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ९ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत केंद्रीय मंत्री नारायण राणे व खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये अटीतटीची होणार आहे .त्यामुळे देशाचे लक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. देवगड तालुक्यात आज सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी आज सकाळीच किंजवडे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. किंजवडे येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.

सकाळपासूनच मतदार केंद्रावर मतदार बांधवाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय .उष्णतेचे दिवस असल्यामुळे मतदारचं मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत लोकशाही वाचवण्यासाठी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावा असे आवाहनही यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष टेंबुलकर यांनी मतदार बांधवांना केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९१८ मतदान केंद्रावर ६ लाख ६४ हजार ५६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख २७ हजार ७३५ ,कुडाळ विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख १२ हजार ३६० सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात २ लाख २४ हजार ४७१ असे एकूण ६ लाख ६४ हजार ५६६ मतदान यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.