कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीमध्ये एक तरुण जखमी झाला प्रदीप सुरेश लवटे (वय ३५, रा. सत्याई नगर, फुलेवाडी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी लवटे यांनी दोघांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रदीप लवटे आणि याच परिसरात राहणारा सागर चौगुले यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद आहे. या वादाच्या रागातून सागर चौगुले आणि त्याच्या साथीदारांनी फुलेवाडी रिंगरोडवर पाठलाग करून प्रदीप लवटे यांना बेदम मारहाण केली. यात लवटे जखमी झाले. याप्रकरणी लवटे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सागर चौगुले याच्यासह दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.