कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही तर या मतदारसंघात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यातच आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे धैर्यशील माने, राजू शेट्टी आणि राहुल आवाडे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणूक जसजशी निवडणूक येईल तसतस राजकीय वातावरणही तापत आहे.

राज्यातल्या महत्त्वाच्या मतदासंघांपैकी एक असलेल्या हातकणंगले मतदारसंघातही मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र महायुतीतून उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे आता थांबणं अशक्य असल्याचं राहुल आवाडे यांनी म्हटलं आहे. राहुल आव्हाडे यांच्या भूमिकेकडे आता राज्यासह जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले असले तरी अद्याप उमेदवार काेण असणार हे अद्याप निश्चित केले नाही. माजी आमदार सुजित मिणचेकर आणि शाहुवाडी – पन्हाळा तालुक्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची नावे ठाकरे गटाकडून चर्चेत आहेत.सध्या मातोश्री वरून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.