कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना संधी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक तसेच हातकणंगलेचे खासदार धैर्यशिल माने यांना संधी मिळणार का ? हा सवाल अद्याप संपलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या दोन नेत्यांबाबत मतदार संघात असलेलं वातावरण तसेच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही सर्वे झाले असून, या सर्वेची निरीक्षणे लक्षात घेता, हा निकाल प्रलंबित असल्याचं स्पष्ट आहे. त्याचबरोबर या नावांची घोषणा झाली नसल्याने एक तर पक्षश्रेष्टीकडे या नावांवर पुन्हा पुन्हा चर्चा करण्यासारखे काही मुद्दे आहेत. अथवा थेट निर्णय घेण्यासारखी स्थिती मतदार संघात नाही. अशी शक्यता आता स्थानिक पातळीवर वर्तवली जात आहे.

अस असलं तरी पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील तो निर्णय या नेत्यांना मान्य करावा लागणार आहे. कारण या निर्णयावर महायुतीतील मित्रपक्षांशी एकसंध राहणे शक्य होणार आहे. त्यामुळे महायुतीतील राजकीय पक्षांचे निर्णय अन् उमेदवारांचे निर्णय नेमके काय असणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.