पुणे ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात भव्य सभा होणार आहे. यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. या सभेकरीत लोकांना आमंत्रण देण्यासाठी भाजपने आज वेगळीच पद्धत अवलंबली आहे, ती म्हणजे दवंडी. पारंपरिक दवंडी पद्धतीने सभेचे निमंत्रण दिले जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, दवंडी म्हणजे एक पारंपरिक निमंत्रण पद्धती! पूर्वी दवंडी शिवाय कुठल्याही कार्यक्रमाचे निमंत्रण अपूर्णच असायचे. काळानुसार दवंडीची प्रथा हद्दपार होऊन त्याची जागा आता अद्ययावत तंत्रज्ञानाने घेतली आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज हल्ली ऐकायला मिळत, नाही.

मात्र देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पुण्यनगरी येथे होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेसाठी पुण्यातील गिरीश खत्री मित्र परिवाराच्या माध्यमातून पारंपरिक दवंडी पद्धतीने सभेचे निमंत्रण दिले जात आहे. काळानुसार लुप्त होत गेलेली दुर्मिळ दवंडी पद्धती पाहून वेगळाच आनंद झाला असल्याचे पाटील यांनी म्हटले.