पुदिना ही उन्हाळ्यासाठी अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती मानली जाते. पुदिना अनेक पदार्थ आणि पेयांमध्ये मिसळून खावू शकतो. एवढेच नव्हे तर पुदिन्यामुळे पदार्थाची चव वाढवते आणि आरोग्यासाठी फायदे देखील होतात. त्यामुळे आज पुदिन्याचे पाणी पिण्याचे फायदे समजून घेणार आहोत. आपल्या आरोग्यासाठी पुदिन्याचे पाणी पिणे कसे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया.

पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असून औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर ठरू शकते. ते थंडगार असल्याने उन्हाळ्यात अनेक पेयांमध्ये पुदिनाही टाकला जातो. त्यापासून चटणी बनवली जाते आणि ती रायत्यामध्येही टाकली जाते, पण तुम्हाला माहिती आहे का की त्याचे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.

चला जाणून घेऊया पुदिन्याचे पाणी पिण्याने कोणते फायदे होतात.

  1. मळमळ

जर तुम्हाला मोशन सिकनेस किंवा मळमळ होत असेल तर उन्हाळ्यात याचे सेवन करा. पुदिन्याचा गुणधर्म थंड असल्यामुळे आपल्याला आराम मिळतो.

  1. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म

पुदीन्यामध्ये मेन्थॉल आणि रोझमॅरिनिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट आढळतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करतात.

  1. रोगप्रतिकारशक्ती

पुदिन्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह भरपूर असते. जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत होते.

  1. ताण

तणाव कमी करण्यासाठी पुदिन्याचे पाणी फायदेशीर आहे. त्यामुळे हे प्यायल्याने आराम मिळतो. यात असणारे गुणधर्म आरोग्याला बहुगुणी ठरतात.