राज ठाकरेंच्या गुढीपाढव्याला होणाऱ्या सभेचं ट्रेलर लाँच

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचं वार सर्वत्र वाहत आहे. यात महायुतीचा तिढा अद्याप ही काही सुटण्याचं चिन्ह दिसत नाहीत. अशातच विरोधी पक्ष नेत्यांचा आरोप प्रतिआरोपाचं सत्र चालूचं आहे. नाराज आमदार खासदार पक्ष बदलत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. राज्याचा राजकारण सध्या तापलेलं दिसत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कुणावरती डागणार असल्याच दिसत आहे.

राज ठाकरेंनीआपल्या सोशल मीडियावर गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेच ट्रेलर लाँच केला आहे. त्यात त्यांनी आपल्या मनसैनिकांना साद घातली आहे या ट्रेलर मध्ये मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय, असं म्हणत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय? सर्व सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे.

महायुतीत राज ठाकरे जाणार असल्याची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. पण अद्याप काही ठोस निर्णय मनसेकडून तरी झाल्याचं दिसत नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी दिल्लीवारी केली तिथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याचं बोललं जात होत.

या बैठकीत राज ठाकरे मुंबई लोकसभेची जागा मनसेला मिळावी यासाठी प्रयन्तशील होते.. आता त्यांना ही जागा मिळते की नाही हे येत्या काही दिवसात समजेलच. मुंबई हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुंबई मध्ये शिवसेनेची मजबूत पकड आहे. जसे शिवसेनेची मुंबईत पकड आहे तशी मनसेची सुद्धा पकड आहे. त्यामुळे शिवसेनेला पराभूत करण्यासाठी महायुती मनसेला मुंबई लोकसभेची जागा देण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.