कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) कुरुंदवाड शहर व परिसरात मंगळवारी संध्याकाळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले.अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्माने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला.
दरम्यान वादळी वाऱ्यामुळे शहरातील काही ठिकाणी दुकानाचे बोर्ड पडले तर गनंजय नगर भैरेवाडी व प्रबुद्ध नगर या ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
गेल्या काही दिवसांपासून चकवा देणाऱ्या पावसाने आज चांगलीच हजेरी लावली.वादळामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
शहरातील सकल भागामध्ये पाणी साठले होते.तर काही ठिकाणी गटारी तुडुंब भरून वाहत असल्याने पाणी रस्त्यावर वाहत होते.त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना यातून जाण्यासाठी कसरत करावी लागत होती.मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वादळी वाऱा, विजेच्या कडकडाटासह सुमारे एक तास पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरातून, शेतातून पाणी वाहत होते. मोठ्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता.