कोल्हापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्र व इतरत्र अचानक उद्भवलेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. यामुळे पंढरपूर शहरातील भीमा नदीकाठच्या परिसरांमध्ये व तसेच पंढरपुरात तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती ती निर्माण झाली आहे.
नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थलांतरित करणे व कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन व पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांनी कोल्हापूरचे व्हाईट आर्मी मदत कार्यासाठी मागणी केल्याने व्हाइटआर्मीचे प्रमुख श्री अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक भाट यांच्या नेतृत्वाखाली सुमित साबळे, सुनील जाधव,राजेश्वरी रोकडे,निलेश तवंदकर,श्रेयस धुमाळे, मुकेश माळगे, फयाज जमादार व्हाईट आर्मी रेस्क्यू पथक रेस्क्यू बोट व लाइफ जॅकेट् सह रवाना झाली.