देवगड (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील पाटथर परबवाडी येथील बाळकृष्ण विष्णू परब(७४) यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी मयत झाल्याचे घोषित केले.ही घटना रविवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ५ मे रोजी पाटथर येथील बाळकृष्ण परब यांनी रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घरात असताना आंबा कलमावर फवारणीसाठी मारण्यात येणारे कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या मुलगा अनिल परब याने त्यांना उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणले होते मात्र सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तपासणी अंती देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय विटकर यांनी ते मयत झाल्याचे घोषित केले. मयत परब यांनी कीटकनाशक प्राशन करण्याचे अद्याप कारण समजू शकले नाही.

याबाबत त्यांचा मुलगा अनिल बाळकृष्ण परब यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतच्या अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फकडुद्दीन आगा करत आहेत.