कोल्हापूर : तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज झाली. अनेक दिवसांपासून धडाडणाऱ्या तोफा आज थंडावल्या. त्याआधी आज कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ शहरात रॅली निघाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सुपर संडेची संधी साधून सकाळपासूनच वातावरण ढवळून निघाले होते. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या सांगता रॅलीत मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते. मी कोल्हापुरात तळ ठोकून राहिल्याने संजय मंडलिक, धैर्यशील माने हे दोघेही विजयी होतील. माझ्या उपस्थित राहण्याने विरोधकांच्या पोटात गोळा का आला आहे, असा प्रतिप्रश्न शिंदे यांनी केला.

भर उन्हातही इचलकरंजी शहरात प्रचाराचा धडाका उडाला होता. मुख्यमंत्री शिंदे इचलकरंजी खासदार माने यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या दुचाकी रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्या मिरवणुकीत महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते raju शेट्टी यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराची सांगता केली.