कोल्हापूर(प्रतिनिधी) – सध्या कोल्हापुरात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुरतील राजकीय वातावरण तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून दोन उमेदवारांची नावे समोर आली आहेत. महाविकास आघाडीतून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीतून संजय मंडलिक लोकसभा निवडणुकीत लढवणार आहे. दोन्ही पक्षांनी लोकसभा प्रचाराची सुरुवात केली आहे.

अशातच कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त विधानाने राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी आपल्या विधानामध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील राजकारणात या विषयाच्या चर्चेने जोर धरला असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी ५ कोटींच्या पैज लावली असल्याची बोलले जात आहे

. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक मैदानात उतरले आहेत. याचवेळी चंदगड इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी संजय मंडलिकांना सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला ५ कोटींचा निधी देण्याची पैज लावली आहे. संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यामध्ये ही शर्यत लावली असून सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी देणार असल्याचा शब्द धनंजय महाडिक यांनी दिला आहे.

संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची घोषणा या सभेतून धनंजय महाडिक यांनी केली. सध्या त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.