कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापारेषण महावितरण कंपनीकडून पुईखडी सबस्टेशनमधील तातडीच्या दुरुस्ती कामाकरीता पुईखडी, जुने आणि नवीन आपटेनगर पंपींग स्टेशनकडील विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार (दि.२६) रोजी शहरातील संपूर्ण ए, बी, ई वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे मंगळवार (दि. २७) रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार आहे.

ए, बी आणि ई वॉर्डमधील साळोखे नगर, सुर्वे नगर, महाराष्ट्र नगर, देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगर, दत्त कॉलनी, मनाली हौ.सोसायटी, वसंत विश्वास पार्क, तात्यासो मोहिते कॉलनी, यशवंत पार्क, सानेगुरूजी वसाहत, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रातीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद, शिवाजी पेठ परिसर, मंगळवार पेठ, हनुमान नगर, रायगड कॉलनी, आयसोलेशन हॉस्पिटल, संभाजीनगर, खासबाग मैदान, आर.के.नगर, साळोखेनगर, संभाजीनगर, सुधाकर जोशी नगर, नाळे कॉलनी, मोरे कॉलनी, हनुमाननगर, रायगड कॉलनी, गजानन महाराज नगर, एनसीसी ऑफीस, जरगनगर ले आऊट नंबर १ते ४ बागलचौक,राजारामपुरी,सम्राटनगर, प्रतिभा नगर, वायपी पोवार नगर, पांझरपोळ, दौलत नगर, विक्रमनगर, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, रुईकर कॉलनी, महाडीक माळ, शिवाजीपार्क आणि उपनगरे या परिसर इत्यादी भागातील नळकनेक्शनधारकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा अपूरा व कमी दाबाने होणार आहे.

तरी या भागातील नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.