कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी रविवारी (दि.२) मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ तालुक्यात एकूण ७० केंद्र निश्चित करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर ५० मतदारांचे मतदान होणार आहे, अशी माहिती करवीर प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.  

गोकुळसाठी एकूण ३६५६ पात्र मतदार होते. त्यापैकी ६ संस्थांचे ठराव न आल्याने एकूण पात्र ठरावधारक मतदार ३६५० निश्चित झाले आहे. त्यापैकी ३ ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता या निवडणुकीत ३६४७ मतदारांचे मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय ७० मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. करवीर तालुक्यातील सर्व मतदान कोल्हापूर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या आवारातील इमारतीमधील, तर पन्हाळा तालुक्यातील मतदान वाघबीळ येथील फोर्ट अकॅडमीच्या इमारतीमध्ये होणार आहे. तर इतर सर्व ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये होणार आहे.

१) गगनबावडा – एकूण केंद्र २ – माधव विद्यालय

२) हातकणंगले – एकूण केंद्र २ –  आण्णासाहेब डांगे महाविद्यालय आवारातील आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल, खोली क्र ५ आणि ६,

३) शिरोळ –  एकूण केंद्र २ – पद्माराजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खोली क्र ६ आणि १०.

४) राधानगरी – एकूण केंद्र – ८ राजर्षी शाहू विद्या मंदिर पूर्व बाजू, खोली क्र. १,३, पश्चिम बाजू खोली क्र. १,२,३, कन्या विद्या मंदिर दक्षिण बाजू खोली क्र. १,२ पूर्व बाजू १.

५) गडहिंग्लज – एकूण केंद्र – ६, एमआर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खोली क्र.३ (ड्राईंग हॉल), खोली क्र ४, २, (जुनी इमारत), उत्तरेकडील इमारत खोली क्र. २,५, ८

६) शाहूवाडी – एकूण केंद्र – ६, श्री शाहू हायस्कूल जुनी इमारत खोली क्र.१,२,३,४,५ नवीन इमारत खोली क्र.१

७) पन्हाळा – एकूण केंद्र ६, फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी खोली क्र. १,२,३,४,५,६,

८) आजरा – एकूण केंद्र ४ – व्यंकटराव हायस्कूल जुनी इमारत खोली क्र. १, ४ आणि नवी इमारत  पूर्वेकडील खोली क्र २, उत्तरेकडील खोली क्र. २

९) करवीर – एकूण केंद्र – १२ – न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर, खोली क्र. १,२,४,५,१०,१२, विवेकानंद नागाळा पार्क कोल्हापूर खोली क्र. ११, १२, १८,२०, २१, २५

१०) भुदरगड – एकूण केंद्र – ८, शाहू कुमार भवन गारगोटी खोली क्र.१,३,४,७ कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी खोली क्र.१३, आयसीआरई कॉलेज गारगोटी खोली क्र. १०१, १०२, १०३

११) चंदगड – एकूण केंद्र – ६, कुमार विद्या मंदिर, खोली क्र ३,१, जुनी इमारत खोली क्र. १, नवीन इमारत खोली क्र. १, जुनी इमारत १, ३,

१२) कागल – एकूण केंद्र- ८, जवाहर नवोदय विद्यालय नवीन इमारत खोली क्र.  २,३,४,५, ६, नवीन इमारत पूर्व बाजू खोली क्र. १,२,३,