पुणे – अवघ्या राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष बारामती मतदार संघाकडे लागून राहिले आहे. कारण ही तसेच आहे , बारामतीतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार माजी कृषी मंत्री शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांची लोकसभा निवडणुकीत लढत सुरु आहे. त्यामुळे कोण बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. अशातच कालच बारामतीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. काल बारामतीत मतदान कमी झालं आहे. अशी आकडेवारी समोर आली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार..?

अजित पवार यांनी सांगितले की, लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का कमी झाला, पण बारामतीत थोडं वाढलं आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे मतदान झालेलं नाही. बारामतीमध्ये कसंबसं 60 टक्के मतदान झालं आहे. मतदारांनी मतदान करुन काय कौल दिला आहे हे निकालानंतर कळेल. मतदान कमी झाल्याने चिंता नाही. मागच्या वेळीपेक्षा बारामतीची तुलना करता मतदानाचा टक्का वाढला आहे. कालपासून शिरुर मावळ पुणे लोकसभा मतदारसंघात कामाला सुरुवात केल्याचे ते म्हणाले.

अजित पवार पुढे बारामतीच्या निवडणूक आयोगाकडे तक्रारींवरही भाष्य केले. ते म्हणाले की, दोघांनीही एकमेकांवर तक्रारी केल्या आहेत. अशा तक्रारी होत असतात, त्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. पीडीसीसी बँक उघडी असेल, तर चौकशी करावी, सीसीटीव्ही पाहून कारवाई करा, असे अजित पवार म्हणाले