कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी चित्रपटांत अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर (वय ८४, रा. रुई) यांचे आज (बुधवार) अल्पशा आजाराने निधन झाले. सरोज सुखटणकर यांना पहिल्या पासूनच अभिनयाची अत्यंत आवड होती. त्यांनी वेगळं व्हायचय मला, मुंबईची माणसं, प्रेमा तुझा रंग कसा अशा अनेक नाटकात भूमिका साकारल्या होत्या.
तर बाई मी भोळी, कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस, सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, एकटा जीव सदाशिव, सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, सावज, सहकार सम्राट, भुजंग, तोतया आमदार, धुमधडका, लेक चालली सासरला, कुलस्वामिनी अंबाबाई, इरसाल कार्टी, दे दणादण, बळी राज्याचे राज्य येऊ दे अशा अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे २००६ साली चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.