रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी परिसरातील नागरिकांसाठी महावीर गाट सोशल फौंडेशनच्या माध्यमातून अनेक विकासाभिमुख आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे युवा नेते अमित महावीर गाट यांचा वाढदिवस आज (रविवार) विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अथायु हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. तसेच कोरोना काळात निर्माण झाला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर  मजूर, बांधकाम कामगार यांची मोफत नोंदणी करून त्यांना साहित्य वाटप करण्यात आले. गणेशोत्सव काळात घेतलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत राबवलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांना हुपरी व परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, महावीर गाट, नगरसेवक रफिक मुल्ला, जयकुमार माळगे, सुभाष कागले, उद्योजक नितीन धुत, माजी सरपंच मंगलराव माळगे, रांगोळीचे माजी सरपंच अनिल शिरोळकर आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.