टोप (प्रतिनिधी) : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राम प्रताप झंवर सभागृह येथे आयोजित केलेले रॅपिड अँटीजन टेस्ट व लसीकरण कॅम्पमध्ये आज अखेर १ हजार ३६९ जणांनी रॅपिड अँटीजन टेस्ट आणि ३०५ जणांचे लसीकरण करण्यात आले. 

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची यांच्या सहकार्याने या कॅम्पचे आयोजन केले आहे. यापुढेही हे कॅम्प चालू राहणार आहे, तरी जास्तीत जास्त उद्योजक, कामगार, स्टाफ यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन स्मॅकने केले आहे. तर हे कॅम्प निश्चितच फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केले आहे.

यावेळी  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे, क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, कार्यकारी अभियंता सुभाष मोरे, उप अभियंता इराप्पा नाईक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्यूज, आरोग्य सुपरवायझर प्रशांत घोलप,  बाबा जांभळे, डॉ. संजय देसाई, डॉ. रवी तेजा, रवी कुंभार, सोनल पोवार, स्मॅकचे उपाध्यक्ष दिपक पाटील, ऑन. सेक्रेटरी जयदिप चौगले, खजानिस एम. वाय. पाटील, आयटीआय चेअरमन राजू पाटील, अमर जाधव, नीरज झंवर, संचालक जयदत्त जोशिलकर,  श्यामसुंदर तोतला, सुरेंद्र जैन, प्रशांत शेळके, दीपक परांडेकर, भरत जाधव आदी उपस्थित होते.