सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सोलापुरात आयोजित महिला मेळाव्यास उपस्थित राहून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना सन्मान मिळावा यासाठी अनेक योजना राबविल्या असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे. तसेच, स्वच्छ भारतासाठी प्रत्येक घरात शौचालये बांधून दिल्याने ग्रामीण भागातील महिलांची मोठी अडचण दूर झाली. अशा अनेक योजनांमुळे देशातील माता भगिनींचे जीवनमान सुधारले असून त्यांना सन्मानही मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रत्येक व्यक्तीच्या नावात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने महिलांच्या सन्मानात आणखी भर पडली आहे. हे माता भगिनींच्या आशीर्वादानेच शक्य होत आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.