चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. लोक आपल्या दिवसाची सुरुवात देखील चहाने करतात. असे अनेक लोक आहेत. ज्यांना वेळेवर चहा लागतो आणि जर का त्यांचा चहाची वेळ चुकली तर त्यांचा दिवस फारच खराब जातो. असे देखील अनेक लोक आहेत, ज्यांना कडक चहा प्यायला आवडतो त्यामध्ये पण दुधाचा चहा म्हणजे काहींच्यासाठी समाधान म्हणायला काही हरकत नाही. पण थांबा चहात दुध घालून पिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दुधाची चहा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते हे आमचं नाही तर अनेकांचं असं मत आहे की, सकाळची सुरुवात एक कप गरम चहाने केली तर दिवसभर ताजेतवाने वाटते. पण चहाशी संबंधित एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहित असली पाहिजे, ती म्हणजे रिकाम्या पोटी दुधासोबत चहा पिण्याचे जेवढे फायदे आहेत त्यापेक्षा जास्त जास्त तोटे आहेत जाणून घ्या

जाणून घ्या फायदे..!

हे फायदे शरीराला मिळतात हा चहा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते यात शंका नाही कारण चहा प्यायल्यानंतरच त्यांना कोणतेही काम करण्यासाठी शरीरात ऊर्जा जाणवते. डोकेदुखी दूर करण्यासाठी आलं घातलेला दुधाचा चहा चांगला प्रभाव दाखवतो. कारण आलं वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. दुधाच्या चहाला मूड लिफ्टर देखील म्हटले जाऊ शकते. यामुळे मूड पूर्वीपेक्षा चांगला होऊ शकतो. तणाव कमी करण्यासाठी दुधाच्या चहाचे फायदे देखील दिसून आले आहेत. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणारी माणसे वेळोवेळी चहा पित असतात.

दुधाच्या चहाचे तोटे

पोट फुगणे
जास्त दूध असलेला चहा पिताय? आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा चहा प्यायल्याने पोट फुगते. चहामध्ये कॅफिन असते, जे पोटासाठी चांगले नाही. या पेयात दूध घातल्यास आम्लता वाढते.

बद्धकोष्ठता होणे
चहामध्ये कॅफिनशिवाय थिओफिलिन देखील असते. जास्त चहा पिल्याने शरीर निर्जलीकरण होते, ज्यामुळे गंभीर बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते.

ताणतणाव
जर तुम्ही सतत चिंतेने त्रस्त असाल तर वारंवार चहा पिणे बंद करा. असं म्हणतात की, हा चहा घेतल्याने अजून त्रास वाढतो. यामुळे भविष्यात तुम्हाला गंभीर स्वरुपाचा त्रास होऊ शकतो.

निद्रानाशची समस्या
चहामध्ये कॅफीन असते, जी तुमची झोपेत व्यत्यय आणू शकते आणि निद्रानाश होऊ शकते. त्यामुळे आधीच निद्रानाश लक्षणांनी त्रस्त असताना दुधाचा चहा पिणे टाळा.

उच्च रक्तदाब
जास्त दूध असलेल्या चहामुळे रक्तदाबात असंतुलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने दुधासोबत चहा जास्त प्रमाणात घेऊ नये.

डिहायड्रेशन
जास्त दूध असलेल्या चहामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, म्हणून दूध आणि साखर मिसळले