सोलापूर ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची विशाल सभा झाली. या सभेस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ‘भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

योगीजी म्हणले कि, आज मोदीजींच्या कणखर नेतृत्वात देशातील दहशतवादाला आळा बसला आहे. आपलं चुकीच्या दिशेने गेलेलं एक मत दहशतवादाचा तो काळ पुन्हा परत आणण्यास कारणीभूत ठरू शकतं ! काँग्रेसला जे इतक्या वर्षांत जमलं नाही, ते आदरणीय मोदीजींनी गेल्या 10 वर्षांत करून दाखवलं. आज मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे देशातील तब्बल 25 कोटी गरीब गरिबीतून बाहेर आले आहेत.

ही किमया घडवून आणणाऱ्या मोदीजींनाच पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन यावेळी योगीजींनी सोलापूरकरांना केलं. योगीजींच्या आगमनानंतर जय श्रीरामच्या घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला. या सभेने सोलापूरमधील राम सातपुते यांच्या विजयावर जणू शिक्कामोर्तब केले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, आ. सुभाष बापू देशमुख, आ. विजय मालक देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. संजय मामा शिंदे, आ. सचिन दादा कल्याणशेट्टी, युवा नगरसेवक देवेंद्र कोठे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे, निवडणूक प्रमुख विक्रमजी देशमुख, शिवसेना नेत्या ज्योतीताई वाघमारे, प्रणव मालक परिचारक, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे, जिल्हा सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, जिल्हा सरचिटणीस मनिष भैय्या देशमुख, शिवानंद पाटील, संतोष पवार, मनीष काळे तसेच सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.