कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) कोल्हापूर लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी नेते खासदार शरद पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे भेट घेतली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असून ते देखील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने (Congress) कोल्हापूर मतदारसंघ (Kollhapul Loksabha) आपल्या पदरात पाडून घेताना शाहू महाराजांना रिंगणात उतरवलं आहे. तेव्हापासून कोल्हापूर लोकसभेची राजकीय गणिते बदलून गेले आहेत. महायुतीमध्ये सुद्धा उमेदवारीवरून खल सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यात महाराजांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या भेटीबद्दल गुप्तता पाळणार पाळण्यात आली असली, तरी उद्धव ठाकरे उद्या दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास राजवाड्यावर महाराज महाराजांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भेटीवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवसेना उपनेते संजय पवार उपस्थित असणार आहेत.