कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे भेट देत चर्चा केली. यावेळी त्यांनी शाहू महाराजांच्या प्रचारासाठी तर येणार आहेच या बरोबर त्यांच्या विजयी सभेला देखील येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उद्धवसेनेची संपुर्ण ताकद आता शाहू महाराज छत्रपती यांच्यामागे उभी राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

यावेळी ठाकरे यांनी माध्यमांना संबोधित करताना ठाकरे कुटुंबिय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. पुढील पिढ्या ही ते असेच राहतील अशी भुमिका घेतली. उद्धवसेना शाहू महाराज छत्रपती यांना विजयी केल्याखेरीज गप्प बसणार नाही. तसेच मीही शाहू महाराजांच्याकडे काहीतरी मागितलं आहे.

इथून पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांची साथ मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे या दौऱ्याने कोल्हापुरातील राजकीय वातावरण काहीसं तापलं आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शाहू महाराज छत्रपती खासदार संजय राऊत, सावंतवाडीचे आमदार वैभव नाईक, उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र तेजस ठाकरे, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.