मुंबई – काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांच्या लक्ष लागून राहिले होते. अखेर महाराष्ट्र बोर्डाने बारावी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.दुपारी १ वाजता हा निकाल लागणार आहे यांची विध्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ ही परीक्षा घेण्यात आली होती. सर्व विद्यार्थी विदयार्थी mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवर जाऊन देखील बारावीचा निकाल पाहू शकता.

यंदा राज्यात 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान परीक्षा पार पडल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. आता दहावीच्या निकालाचे काम देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जातंय. आता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालची प्रतिक्षा लागून राहिली आहे.