टोप प्रतिनिधी – परप्रांतीय महिलेस जास्त पगाराची नोकरी लावतो असे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या माजिद खान , व रूस्तम खान या दोघा परप्रांतीयांवर शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार छत्तिसगढ येथील पिडीत महिलेल्या रूस्तम खान याने जास्त पगाराची नोकरी मिळेल असे खोटे आश्वासन देवून तिची ओळख माजिद खान याच्याशी करून दिली माजिद खान याने तिला जास्त पगार पाहिजे असेल तर तु कोल्हापुर येथे ये तुला मी भरपुर पैसे मिळणारे मोलमजुरीचे काम देतो असे सांगुन पिडीत महिलेस तिच्या गावाहुन शिरोली पुलाची येथील आपल्या रुमवर बोलवुन माजिद खान याने दि. 11/05/2024 रोजी रात्री पिडीत महिलेला आपल्या मिठीत घेवुन तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पिडीत महिलेने माजिद खान यास प्रतिकार केला असता माजिद खान याने पिडीत महिलेला तु आरडाओरडा केलास व कोणाला सांगीतले तर तुला व तुझ्या कुंटुबाला जीवे ठार मारणेची धमकी देवून माजिद खान याने पिडीत महिलेच्या अंगावरील सलवार व अंतवस्त्र काढुन जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संभोग केला. व दुसऱ्या दिवशीही रात्री पिडीत महिलेच्या इच्छे विरुध्द जबरदस्तीने शारीरीक संभोग ठेवले माजिद खान याने पिडीत महिलेस आपले रुममध्ये कोंडुन ठेवले अशी पिडीत महिलेने तक्रार शिरोली पोलिसात दिली आहे .