नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून लोकांचे लक्ष वेधण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. ईव्हीएम मशीनला हार घातल्याप्रकरणी नाशिक लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानानंतर ईव्हीएमला हार घातल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी दाखल होण्याची शक्यता आहे. शांतीगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर एटीव्हीएम मशीनला हार घातला होता. त्र्यंबकेश्वरमधील  कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता.

नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्रम्बकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजाने आपल्या गळ्यातील ईव्हीएम मशीनला घातला. आम्ही सर्व गोष्टींमध्ये देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव आहे, असे शांतिगिरी महाराज यांनी यावेळी  सांगितले. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून वंदन केले हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र  मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.

शांतीगिरी महाराजांनी सकाळी सात वाजता मतदान केले. मतदान केल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी त्यांच्या बोटाला शाई लावली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. कुठेतरी हा आदर्श आचार संहितेचा उल्लंघन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.