कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात मोटरसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरात घरासमोर पार्क केलेल्या दुचाकींना चोरट्यानी लक्ष केले आहे. दररोज दोन ते तीन घटना शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घडत आहेत. भरदिवसा हे चोरटे मोटरसायकलीवर हात साफ करतात.

शहरासह उपनगरात चोरट्यानी थैमान घातले आहे. यापाठोपाठ आता चोरट्यानी शहरातील दुचाकींवर निशाणा केला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातून चोरट्यांनी मोटारसायकल लंपास केल्या आहेत. आज उपनगरातील बोंद्रेनगर येथील एका घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. तर करवीर तालुक्यातील आंबेवाडी गावात मुख्य मार्गावर अपघातात पडलेली मोटारसायकला चोरट्यांनी लक्ष केले.

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भरदिवसा या घटना घडत असल्याचे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांत मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. दिवसाढवळ्या मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले असून वाढत्या चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.