मुंबई (प्रतिनिधी) : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज (रविवार)  आणखी मोठी कारवाई केली. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.

पैसे देऊन टीआरपी वाढविणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये पर्दाफाश केला होता. रिपब्लिक वृत्तवाहिनीसह इतर दोन मराठी वाहिन्यांची नावे या प्रकरणात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे खानचंदांनी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना आता अटक केली आहे.

मुंबई पोलिसांकडून दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिक वृत्तवाहिनीने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. आता