कोल्हापूर (प्रतिनिधी) : निगवे खालसा येथे युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वतीने शहीद संग्राम पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मेणबत्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अमर रहे अमर रहे शहीद जवान संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देऊन पाकिस्तानचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 

यावेळी युथ सोशल पॉवर ग्रुपचे संस्थापक ओंकार शिंदे, किसन खंदारे, प्रसन्न वैद्य, सचिन पंडत, आकाश गुरवळ, सिद्धेश सावंत, आकाश झेंडे, जयराज ओतारी, हर्षद ओतारी,धीरज भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.