वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज (सोमवार) दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. तसेच आदिमाता श्री चोपडाई देवीचीही अलंकारिक सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. श्री जोतिबाची महापूजा प्रकाश सांगळे, दगडू भंडारी, चैतन्य उपारे, गणेश प्रल्हाद बुणे आणि श्रीचें मुख्य पुजारी श्रावण सांगळे यांनी बांधली.