मुंबई : काँग्रेसला सोडून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणखी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली कांग्रेस नेते झुकले, असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंवरही निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुनः मोठा राजकीय भूकंप होईल. असा गैप्यस्फोट खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. तसेच निवडणुकीआधी काँग्रेसचे सगळे मोठे नेते पक्ष सोडून जात आहेत, असा दावाच अशोक चव्हाण यांनी केला आहे. संजय निरुपमसारखा चांगला नेता गेला, मिलिंद देवरा.. असे असंख्य नेते जे नाराज, अस्वस्थ आहेत. ज्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे, ते लवकरच योग्य निर्णय घेतील याची मला खात्री असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. यावेळी, आपण काँग्रेस पक्ष सोडण्यामागे नेमकं राजकारण काय घडलं, याचाही उलगडा करताना, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचं राजकारणही सांगितलं.

नाना पटोले सगळं स्वःताच्या इच्छेनुसार करतात.कोणाला ही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्षा आहेत, पण त्यांना न विचारता मुंबईच्या जागांचे वाटप झाले, आणि उमेदवारही घोषित झाले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली काँग्रेस नेते झुकले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला ज्या जागा हव्या होत्,या त्या घेतल्या आणि जे उरलं सुरलं आहे ते कांग्रेसला मिळालं. राज्य नेतृत्वाने याबाबत काहीच केलं नाही.मी जर काँग्रेसमध्ये असतो तर हे होऊच दिलं नसतं, असेही चव्हाण यांनी म्हटले.

यासाठी मी काँग्रेस सोडली
ज्या पक्षाचं भविष्य नाही, त्या पक्षात आपलं भविष्य काय होणार. जिंकण्याचं जिद्द नाही, पक्ष पुढे नेण्याची पक्ष नेतृत्वालाच इच्छा नाही तिथे थांबून मी करणार काय, असा सवाल करत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं कारण सांगितलं. काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीसाठी विद्यमान नेतृत्वच जबाबदार आहे. नाना पटोलेंसारखे थोर विद्वान जर पक्ष चालवत असतील तर त्या पक्षाचे काय होणार,असा प्रश्नही अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे, पवारांचा काँग्रेस दबाव
नाना पटोले सगळं स्वःताच्या इच्छेनुसार करतात.कोणाला ही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्षा आहेत, पण त्यांना न विचारता मुंबईच्या जागांचे वाटप झाले, आणि उमेदवारही घोषित झाले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली काँग्रेस नेते झुकले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला ज्या जागा हव्या होत्,या त्या घेतल्या आणि जे उरलं सुरलं आहे ते काँग्रेसला मिळालं. राज्य नेतृत्वाने याबाबत काहीच केलं नाही.मी जर काँग्रेसमध्ये असतो तर हे होऊच दिलं नसतं, असेही चव्हाण यांनी म्हटले.