कोल्हापूर (प्रतिनिधी) : उमा टॉकीज परिसरातील हॉटेलचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १७ हजारांची रोकड लंपास केली. या प्रकरणी वाहिद नूरमहम्मद बागवान (वय ४०, रा. गुलमोहर कॉलनी, साळुंखे पार्क) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वाहिद बागवान यांचे उमा टॉकीज येथील पूल गल्ली बस स्टॉपसमोर हॉटेल आहे. मंगळवारी रात्री बागवान हॉटेल बंद करून घरी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या हॉटेलच्या कडी-कोयंडा उचकटून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी ड्रॉवरमधील १७ हजार रुपये लंपास केले. आज सकाळी बागवान यांना हा प्रकार निदर्शनास आला.