टोप (प्रतिनिधी) : नूर-ए-रसूल फौंडेशनने कोरोनाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपली आहे. रुग्णांशी सलोख्याचे नाते ठेवल्यानेच एका महिन्यात अडीचशेहुन अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असल्याचे मत आरोग्य राज्यमंत्री नाम. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले. ते शिरोली इथल्या मदरसामधील कोव्हिड सेंटरमध्ये बोलत होते.

हातकणंगले तालुक्यातील शिरोली पु इथल्या मदरसामध्ये कोल्हापुरातील डॉ. असिफ सौदागर यांनी नूर-ए-रसुल फौंडेशनच्या माध्यमातून कोव्हिड सेंटर सुरु केले आहे. एक महिन्यात येथे सर्व जाती-धर्मांच्या २५३ रुग्णांवर योग्य उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. इथे आँक्सिजन बेड सह १०० बेड उपलब्ध असुन तज्ञ डाँक्टरांची टिमही तैनात आहे. अल्प मोबदल्यात सेवा दिल्याने कोल्हापुरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातुन रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. आज या सेंटर ला आरोग्य राज्यमंञी नाम राजेद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, नूर ए रसुल फौंडेशनन कोरोनाच्या काळातही सामाजीक बांधिलकी जपली आहे. रुग्णांशी सलोख्याचे नाते ठेवल्यानेच एका महिन्यात अडीचशेहुन अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोना योद्धा म्हणुन काम केलेल्या डॉक्टरांनीही जिवाची पर्वा न करता सेवा केली आहे. त्यांचे कार्य खरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, नूर रसुल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. आसिफ सौदागर, रहिद खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. शकील महाबरी, डॉ. शब्बीर हजारी, डॉ. अमिर हजारी, डॉ. नसिर हजारी, डॉ. सना हजारी यांना नाम. पाटील यांचे हस्ते कोविड योद्धा म्हणुन प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, शिरोली सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, बाजीराव पाटील, सरदार मुल्ला, ए. एस. कटारे,  डॉ. वासिम मुल्ला, डॉ. अरिफ पठाण, डॉ. जुनेद पठाण, यासिन पठाण, वाहिद शिकलगार यांच्यासह फौंडेशनचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.