कुरुंदवाड प्रतिनिधी :- सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे व्यवस्थित वैद्यकीय उपचार न केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून सुभाष वसंत पाटील यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद डॉ. दिलीप दादासो पाटील (रा. अकिवाट) यांनी येथील पोलिसांत दिली आहे. डॉ. पाटील यांच्या टाकळी येथील इंदुमती क्लीनीकमध्ये शनिवारी सायंकाळी मारहाणीची घटना घडली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार डॉ. पाटील यांचे सैनिक टाकळी येथे दवाखाना आहे. चार महीण्यापूर्वी सुभाष पाटील यांने आपल्या यश नामक मुलाला उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. मात्र त्याचा मृत्यू झाल्याने डॉ. पाटील यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा राग पाटील यांना होता. हाच राग मनात धरून सुभाष पाटील याने शनिवारी सायंकाळी डॉ. पाटील यांच्या टाकळीतील दवाखान्यात घुसून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक संतोष साबळे करीत आहेत.