पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील परमेश्वर गाडे आणि त्याच्या बायकोचं कडाक्याचे भांडण सुरू झाले होते. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहात असलेले संतोष चौगुले हे भांडण सोडवायला गेले होते.

यावेळी डोक्यावर परिणाम झालेल्या परमेश्वर गाडे याने संतोष चौगुले यांनाच मारायला सुरुवात केली. तसेच हातातील कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी यांच्या डोक्यावर बसलेल्या वर्मी घावाने चौगुले यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी परमेश्वर गाडेला ताब्यात घेतले आहे.