टोप (प्रतिनिधी) : टोप येथील शतकमहोत्सवी छ. राजाराम वि.का.स. सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणुक गेली दोन वेळेस बिनविरोध झाली होती. यापुर्वी २००३ साली निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. यावर्षीही संस्था बिनविरोध करण्याचा प्रयत्न काही सभासदांकडून करण्यात आला होता. पण संस्थेतील काही अंतर्गत राजकारणामुळे बारा वर्षानंतर निवडणुका लागल्या आहेत.

यावेळी संस्थेची दुरंगी लढत होत असून यामध्ये सत्ताधारी आघाडीकडून भगवान पाटील, तानाजी पाटील, कल्लेश्वर मुळीक, केशवराव गायकवाड, नंदकुमार मिरजकर, गब्बर पाटील हे आहेत. तर विरोधी परिवर्तन आघाडीकडून पिलाजी पाटील, दिलिप पाटील, मुकुंद पाटील, विकास पाटील, विठ्ठलपंत पाटील, प्रकाश पाटील हे आहेत.

या संस्थेत एकुण ५४३ सभासद असून १७ जागांसाठी मतदान होणार आहे. तर सध्या ४९ उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. तर २६ नोव्हेंबर रोजी माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. तर अंतीम यादी २९ नोव्हेंबरला घोषित होणार आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यत मतदान तर त्यांनतर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.