साळवण (प्रतिनधी)  :  गगनबावडा तालुक्यातील माधव विद्यालयात  गोकुळ दूध संघाची निवडणूक मतदान प्रक्रिया  आज (रविवार) शांततेत पार पडली. यावेळी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे ठरावधारक मतदार यांनी पिवळ्या टोप्या व पिवळे मास्क घालून शक्ती प्रदर्शन करत मतदान केले.  तर पालकमंत्री सतेज पाटील यांनीही मतदानाचा हक्का बजावला.  

मतदान प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरु झाली. यावेळी काही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर १०. ४६ वाजता शाहू शेतकरी आघाडीच्या गाड्यांचा ताफा आला. यावेळी मतदारांनी पिवळ्या टोप्या व पिवळे मास्क लावून व गळ्यामध्ये पिवळे मफलर परिधान करून शक्ती प्रदर्शन करत मतदान केले. दुपारी १२ पर्यंत  ७६  मतदानापैकी ७३ मतदान झाले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी वार्ड क्रमांक २ मध्ये ३.३५ वाजता  येथे मतदान केले. त्यानंतर त्यांनी  कोरोना परिस्थितीचा आढावा तहसीलदार संमेश कोडे यांच्याकडून घेतला. या मतदानानंतर ७६ पैकी ७५ मतदान झाले. एपीआय  रणजीत पाटील यांनी चोख बंदोबस्त लावून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली.