मुंबई (प्रतिनिधी) : पूर्व किनारपट्टीवर दाखल झालेल्या मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यातील हवामान गेले काही दिवस ढगाळ होते. काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली होती. आता वादळाचे ढग कमी होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील किमान तापमानात गेल्या २४ तासांमध्ये घट झाली आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.५ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २६ अंशांच्या दरम्यान होते. बुधवारी तुरळक ठिकाणी मध्यम आणि हलक्या स्वरुपात पाऊस झाला. आता या वातावरणात बदल होत असून. पावसाळी ढग दूर जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.