कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील पहिल्या ग्रामपंचायत संचलित लहान मुलांच्या कोव्हिड सेंटर हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन माजी खासदार राजू शेटटी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आ. प्रकाश आवाडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी विकास खरात, हातकंणगले तहसिलदार उबाळे, जयसिंगपूर नगराध्यक्ष निता माने, माणगांवचे सरपंच राजू मगदूम, ग्रा.पं. सदस्य, कोरोना समिती सदस्य उपस्थित होते.